फोटो एडिटिंगसाठी 'हे' App वापरा आणि फोटोचे सौंदर्य खुलवा

 फोटो एडिटिंगसाठी 'हे' App वापरा आणि फोटोचे सौंदर्य खुलवा 




फोटो एडिटिंगसाठी 'हे' App वापरा आणि फोटोचे सौंदर्य खुलवा 

अनेक वेळा छान स्टेटस ठेवायचे असते किंवा वाढदिवसाला छोटे पोस्टर बनवायचे असते. अशावेळी गरज पडते फोटो एडिटिंग स्कीलची. आपण उत्तम फोटो एडिटिंग अॅप शोधत असाल तर आपल्यासाठी यादी घेऊन आलो आहे.

पिक्झलर - Pixlr (https://pixlr.com/)
पिक्झलर मध्ये वापरण्यासाठी सोपे फिल्टर्स आणि इफेक्ट्स व्यतिरिक्त, विंटेज करेक्शन सारखे पर्याय देखील दिले जातात आणि आपले एडिट केलेले फोटो सोशल मीडिया वर शेअर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

वस्को - VSCO (https://vsco.co/)
फोटो एडिटिंगसाठी या अॅपमध्ये प्रीसेट फिल्टर्स आणि टूल्स देण्यात येत आहेत आणि तुम्ही ऑनलाइन कम्युनिटीचा भाग बनून एडिटिंग करू शकता. यामध्ये केवळ उच्च दर्जाच्या इमेज एडिटिंगचा पर्याय उपलब्ध नसून त्यावर व्हिडिओ एडिटिंगही करता येते.

ऐव्हरी - Aviary
केवळ आयफोन वापरकर्त्यांसाठी हे अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे, तुम्ही या अॅपमध्ये संपादन करू शकता, तसेच वन-टॅप मजेदार साधने देखील उपलब्ध आहेत. फिल्टर्स व्यतिरिक्त, स्पेशल इफेक्ट्स जोडण्याचा पर्याय देखील आहे आणि सोशल शेअरिंगसाठी मजकूर आणि फोटो संपादित केले जाऊ शकतात.

पिक्स आर्ट - Pics Art (https://picsart.com/)
तुम्हाला कलाकारी करायला आवडत असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोटोंमध्ये रंग भरू शकता. तुम्हाला तुमच्या फोटोंमध्ये स्टिकर्स आणि क्लिपआर्ट वापरण्याचा पर्याय देखील मिळेल. तुम्ही अनेक लेयर्समध्ये रेखाटून आणि रीमिक्स करून, उत्तम प्रकारे एडिट करून छान छान फोटो तयार करू शकता. हे सर्वात लोकप्रिय फोटो एडिटिंग अॅप आहे.

टूल विझ फोटो एडिटर - ToolWiz Photo Editor
ह्या अॅप द्वारे क्रिएटिव्हली फोटो एडिट करता येतात. तसेच हा अॅप गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. दहा लाख हून अधिक लोकांनी हा अॅप डाऊनलोड केला असून फोटो एडिट करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तसेच ह्या अॅप ला प्लेस्टोअर वर ४.५ स्टार रेटिंग आहे. ह्यामध्ये ८० हून जास्त परफेक्ट फिलिंग टोन फिल्टर्स, १० पेक्षा जास्त पेंटिंग फिल्टर्स, असे अनेक फीचर्स वापरता येतात.

स्नॅपसीड - Snapseed
एडिटिंगसाठी सर्वात उत्तम अद्ययावत वैशिष्ट्ये पुरवणारे, हे अॅप तुम्हाला लाईट अडजस्टमेंटपासून ते तुमच्या फोटोंवर वेगवेगळे फिल्टर लागू करण्यापर्यंत सर्व काही करू देते. यामध्ये फोटोला वास्तववादी आणि नाट्यमय स्वरूप देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

तुम्ही मोबाईलमध्ये आजवर छान छान फोटो नक्कीच काढले असतील पण या यादीत दिलेल्या अॅप्स च्या मदतीने आपण हे फोटो एडिट करून अजून छान बनवा. आणि फेसबुक टाकून अधिकाधिक लाईक्स मिळवा.

You Might Also Like

0 Comments

Top Categories